नमो नमो नम: [१६ मे २०१४]
तीस वर्षांत पहिल्यांदा भारतीय जनतेने एका पक्षाला बहुमत देऊ केले...त्यावर रचलेल्या काही ओळी
घडाळ्याचे मोडले काटे
मुरगळला की हात
कमळाला धनुष्यबाणाची
दमदार साथ
मुरगळला की हात
कमळाला धनुष्यबाणाची
दमदार साथ
इंजिन शिरले बोगद्यात
उजेड काही दिसेना
लालूंचा कंदील
काही केल्या पेटेना
उजेड काही दिसेना
लालूंचा कंदील
काही केल्या पेटेना
विळा हातोडा मोडे
झाडू खराटा झडे
मायावतींचा हत्ती
खड्डयात पडे
झाडू खराटा झडे
मायावतींचा हत्ती
खड्डयात पडे
सायकल झाली पंक्चर
बोथट नितीशचा बाण
मोदींनी उडवली
भलती दाणादाण
बोथट नितीशचा बाण
मोदींनी उडवली
भलती दाणादाण
अम्मांचे जरी आहेत
सदतीस चोर
अलिबाबा मोदींना
नॉट वॉंटेड एनी मोर
सदतीस चोर
अलिबाबा मोदींना
नॉट वॉंटेड एनी मोर
चौतीस जणांची टोळी
आल्या घेऊन दीदी
गरज काय मला
मोदी हसती फिदीफिदी
आल्या घेऊन दीदी
गरज काय मला
मोदी हसती फिदीफिदी
तीस वर्षांनी आला
अलौकिक क्षण हा
‘शशिशेखर’ म्हणे
नमो नमो नम:
अलौकिक क्षण हा
‘शशिशेखर’ म्हणे
नमो नमो नम:
Comments
Post a Comment