माझे आणखी सट्ट्याचे प्रयोग [२९ डिसेंबर २०१८]

गोव्यातल्या देशी कसिनोमधल्या अनुभवाने भीड चेपल्यावर आणि खिसा हलका  होता चक्क किंचित जड झाल्यावर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन खेळले पाहिजे असे माझ्या मनात आलेते मात्र माझं एक आहेअर्ध्या हळकुंडाने जास्तीत जास्त पिवळं कोणहोतेय अशी स्पर्धा ऑलिंपिकमधे असती तर मी भारताला कित्येक पिवळी धम्मक सुवर्ण पदके मिळवून दिली असतीपण नाहीह्या जगात सामान्य आणि साध्या माणसांना आपल्या कर्तबगारीवर काहीतरी देदीप्यमान करुन दाखवण्याची संधी मिळतच नाही हेच खरे.म्हणूनच असे लोक सट्ट्याकडे वळतात अशी माझी थियरी आहे.

तर मी संधी मिळताच माझा मोहरा मकावकडे वळवलापूर्वी पोर्तुगीज अमलाखाली असलेले हाँगकाँग जवळचे हे चिमुकले द्वीपकल्प जगातल्या सर्वात श्रीमंत अशा प्रदेशांत गणले जातेइथले दरडोई उत्पन्न भारताच्या सुमारे चाळीस पट आहेगेल्या दोन दशकांत जुगारखेळायला येणार्या पर्यटकांमुळे इथले सरकार इतके श्रीमंत झाले आहे की ते प्राप्तीकर तर जेमतेमच लावतेवर उलट दर वर्षी सर्व नागरिकांवर पाच-हा हजार पटाकांची
खैरात करतेपटाका हे इथले चलन असून त्याची किंमत सध्या नऊ रुपयांच्या आसपास आहेमी इथे का जन्माला आलो नाही असा प्रश्न जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा तेव्हा मोदीजींचे १५ लाखांचे वक्तव्य आठवून मी स्वत:ची समजूत घालून घेतोशिवाय मी मकानीज झालो असतो तर मघाशी म्हटलेली सुवर्णपदके भारताला कशी मिळाली असती?

तर अशा ह्या मकाव प्रदेशी सध्या जुगाराची सर्वाधिक उलाढाल होतेतुम्हाला लास वेगास ह्या अमेरिकन शहराची माहिती असेल पण चीनच्या अभूतपूर्व आर्थिक मुसंडीमुळे मकाव हीच आता गॅम्बलिंगची मोठ्ठ्यात मोठ्ठी मक्का आहेउत्तुंग कसिनो इमारती आणि हॉटेल्सतोंडात बोटे जातील इतका चमचमाट आणि धो धो वाहणारा पैसा पाहायचा असेल तर इथे याबॅक्करा हा खेळ इथल्या कसिनोंमद्धे विशेष लोकप्रिय दिसलाबहुतेक पंटर चिनी वाटत होतेपण म्यानमारलाओसव्हिएतनाम वगैरे गरीब देशातील अमीर लोकही इथे बरेचयेतातगरीब देशातला गरीब असा मी एकटाच होतोइथल्या सर्वच टेबलांवर किमान पैजा २०० ते ५०० पटाकांच्या लागत असल्याने भारतीय खिशाला रिस्क सुरुवातीला जास्तच वाटतेपण अर्थात तुमचे नशीब चांगले असेल तर कमाईदेखील पटाकांत होत असल्यानेएकदा मनाचा हिय्या केला की झालेसगळेच कसिनो २४ तास उघडे असतातप्रत्येक कसिनो आणि हॉटेलमधून विमानतळ आणि जहाज धक्क्याला आणायला-पोचवायला फुकट बसेसची सोय असतेनुकताच चिनी सरकारने एकशे पंचवीस अब्ज युआन (म्हणजे सव्वालाख कोटी रुपयेखर्चून भर समुद्रात ५५ किमी लांबीचा पूल बांधून पूर्ण केलाहा पूल हाँग काँग आणि झुहाई नावाच्या चिनी शहराला मकावशी जोडतोइतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे लावणारे चिनी सरकार हा सर्व जुगार्यांचा बाप आहे अशी खात्रीच या अगडबंबप्रकल्पाकडे पाहून पटते.

चिन्यांची नेत्रदीपक प्रगती पाहून मी भारतात परत आलो आणि लवकरच बातमी आली की आपल्या सरकारच्या विधी मंत्रालयाने भारतात जुगार आणि क्रीडाक्षेत्रातील पैजांसंबंधित कायद्यांचा आढावा घेत त्यात कालानुरूप काही बदल सुचवणारा अहवाल कायदे मंत्र्यांकडेपाठवला आहेआय पी एल शी संबंधित सट्टा आणि मॅच फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधी आयोगाला तशी पाहणी करण्यास सांगितले होतेएखाद्या गोष्टीवर नैतिकतेच्या दृष्टीकोनातून सरसकट बंदी घातली जाते तेव्हा त्या गोष्टीचे समाजातून उच्चाटन होते असेनाहीलोक ती गोष्ट लपून छपून करु लागतात एवढेचदारु, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय यावरील बंदी बहुतेकदा फोल ठरतेकायद्याला धूप  घालणारी किवा कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणारी अनुचित, गुन्हेगारी पार्श्वभूमीची मंडळी त्या उद्योगात शिरतात.आपल्या काळ्या पैशाचा विनियोग करायला आणि तो आणखी वाढवायला त्या मंडळींना एक साधन मिळतेगरीब आणि हतबल नागरिकांचे शोषण होतच राहते आणि एकंदरीत समाजाचे नुकसानच जास्त होते. तेव्हा पूर्णपणे बंदी घालण्यापेक्षा अशा गोष्टींना रीतसरपरवाना देऊन त्यांचे नियमन करावे असा विचार प्रवाह हल्ली बळावू लागला आहेजुगार आणि क्रीडाक्षेत्रातील पैजांसंबंधाने विधी आयोगाचा हा सल्ला केंद्र सरकारला मानवला आणि तसे विधेयक संसदेत पास झाले तर लवकरच तुम्हा आम्हाला वैध प्रकारे खेळांच्यासामन्यांवर बेटिंग करता येईलशिवाय त्यासाठी हिन्दी सिनेमात दाखवतात तशा कुठल्याशा खलनायकी अड्ड्यावर रिकामी पिंपे, खोकी आणि टायर्सने भरलेल्या गोदामात, गालावर मोठ्ठा काळा चामखीळ असलेल्या गुंडाकडे पैशांची सुटकेस घेऊन जावे लागणार नाही.ऑनलाइन बेटिंगची कितीतरी अॅप्स आता जगभर उपलब्ध आहेतघरबसल्या बेटिंगचे रोमांचक जग तुम्ही अनुभवू शकाल.

फुटबॉल वर्ल्डकपच्या वेळी betfair, bet365 अशा काही जागतिक बेटिंग एक्सचेंजेसच्या अॅप्सचा वापर  करुनपैजा लावायचा प्रयत्न मी करुन पाहिलापण भारतात बेटिंग अद्याप बेकायदेशीर असल्याने इथल्या क्रेडिट/डेबिट कार्ड कंपन्या तुम्हाला ऑनलाइन पैसेलावूच देत नाहीतनेटेलर, स्क्रिल अशी काही आंतरराष्ट्रीय -वॉलेट्स (पेटीएम सारखीआहेत ज्यांचा वापर करुन पूर्वी पैसे भरता येत असतहल्ली त्यांनीसुद्धा भारतीयांकडून पैसे घेणे बंद केले आहे असे ऐकतोएवढे करुन तुम्ही पैसे लावू शकलात आणि जिंकलात तर तेपैसे भारतात परत आणणे हेही सामान्यांसाठी अगदी अशक्य नसले तरी जिकीरीचे, खर्चिक आणि कदाचित धोक्याचे काम आहेतुम्ही मोठे उद्योगपती किंवा राजकारणी असाल तर मात्र हे सगळे कसे करता येते ते मी तुम्हाला सांगायची गरज नाहीचतुमच्या विजयकाकाकिंवा नीरवमामाने तुम्हाला आधीच सांगितले असेल.

कसिनो हा जसा गणिती आराखडे आणि मानसिक स्खलनशीलतेवर आधारलेला धूर्त धंदा आहे तसाच बुकमेकिंग हाही एक चतुर आकडेमोडीचा व्यवसाय आहे. रॉयल चॅलेंजर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बंगलोरात सामना होणार आहे असं समजूयाखेळाडूंचा फॉर्म,खेळपट्टीचा स्वभाव, स्थानिक हवामान, गेल्या काही सामन्यांतली संघांची कामगिरी, घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा वगैरे लक्षात घेता रॉयल चॅलेंजर्स जिंकायची शक्यता ५०%, मुंबई इंडियन्स जिंकायची शक्यता ४०आणि ड्रॉ होण्याची शक्यता १०आहे असा गणिती अंदाजआहेयाला म्हणतात खरी संभाव्यता (true odds). बुकीला किमान पैज म्हणून लावल्या गेलेल्या रकमेच्या १०नफा  स्वत:साठी ठेवायचा आहे असे गृहीत धरुतर तो काय करतो, वरील सगळ्या शक्यता १०%ने वाढवतोम्हणजे रॉयल चॅलेंजर्स ५५%, मुंबई इंडियन्स४४आणि ड्रॉ ११%. यानुसार मग तो भाव किंवा ऑड्स (यालाच बेटिंग लाईन असेही म्हणतातअसे देतो:- रॉयल चॅलेंजर्स - /११ (म्हणजे रॉयल चॅलेंजर्सवर तुम्ही ११ रुपये लावलेत आणि ते जिंकले तर तुम्हाला तुमचे ११ रुपये तर परत मिळणारच पण वर  रुपये नफाहीमिळणार). मुंबई इंडियन्स- १४/११ आणि ड्रॉ ८९/११आता वरील सर्व ऑड्सची गोळाबेरीज ११०होते हे तुमच्या लक्षात आले  असेल (११ ला  अधिक ११ ने भागिले तर ११/२० म्हणजे ५५%; ११ ला १४ अधिक ११ ने भागिले तर ११/२५ म्हणजे ४४आणि ११ ला ८९अधिक ११ ने भगिले तर ११/१०० म्हणजे ११%). ह्या ऑड्स वर आता ह्या बुकीकडे  १०० कोटीच्या पैजा आल्या आहेतसाधारणपणे खर्या संभाव्यतांच्या गुणोत्तरातच  (५० लाख : ४० लाख : १० लाखत्या लावल्या गेल्या आहेतआता जर रॉयल चॅलेंजर्स हा सामना जिंकलेतर त्या संघावर ५० लाख लावलेल्या सट्टावीरांना बुकी ५० /११ म्हणजे सुमारे ४१ लाख नफा आणि मुळची पैजेची रक्कम ५० लाख असे एकूण सुमारे ९१ लाख रुपये देणारउरलेले  लाख झाला बुकीचा फायदाअर्थात हे खूप सुलभीकृत उदाहरण झालेप्रत्यक्षात पैजायेतील त्या अगदी बरोब्बर खर्या संभाव्यतांच्या गुणोत्तरातच येतील असे नाहीमग स्वत:चा नफा धोक्यात येऊ नये म्हणून मग प्रत्येक नवीन पैजेसाठी ऑड्समध्ये फेरफार करुन आपले बुक बॅलन्स करायचा प्रयत्न बुकी करतोबंगलोरवर फारच जास्त पैसे लागू लागले तरत्या पैजा घेण्याचे तो थांबवतोमुंबईवरील पैजा वाढाव्यात म्हणून जास्त आकर्षक भाव देऊ करतोअधिकाधिक गुंतागुंतीचे पण पाहता क्षणी एखाद्याच्या तोंडाला पाणी सुटेल आणि बुद्धी गहाण पडेल असे पैजांचे विलक्षण जोखमी पर्याय पुढे करतोहा सर्व व्यवसाय मुळातभूमीगतच करावा लागत असेल तर प्रसंगी खेळाडूंना आमिष दाखवून सामन्याचा निकाल फिरवायचा प्रयत्न करणे हीसुद्धा एक साहजिक पायरी असू शकतेवरील सर्व रोमहर्षक उपद्व्यापांची एक कहाणी बघायची असेल तर अॅमझोन प्राईमवरील इनसाईड एज ही वेबसीरीज पाहायला तुम्हाला आवडेल.


असा सगळा सध्या बेकायदेशीर असलेला खटाटोप करायचा नसेल तर तुम्ही आपले घोड्यांच्या शर्यतीला जा बरेतेही नको असेल तर लॉटरीचं  तिकीट घ्यातुमचं पापभीरु मन त्यालाही धजावत नसेल तर शेअर बाजार आहेचह्या सगळ्या विषयी पुन्हा कधीतरी बोलूया.कुठे  कुठेतरी तुमचे उखळ नक्की पांढरे होईललागली पैज?

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

My Mahakumbh Musings

माझे सट्ट्याचे प्रयोग [१६ सप्टेंबर २०१८]