Posts

Showing posts from March, 2020

मला सगळे सारखेच!

काँक्रीटच्या जंगलातल्या माझ्या घरातून जेवढा निसर्ग दिसतो त्यात सर्व काही आलबेल दिसते आहे. समोरचे झाड वसंताच्या आगमनाने बहरुन आले आहे. त्याला घर मानणाऱ्या दोन-तीन खारुताई त्याच्या फांद्यांवरून नेहमीसारख्याच मजेत पकडापकडी खेळत आहेत. त्या झाडाचे दुसरे एक भाडेकरु कबुतरांचे एक जोडपे. त्यातला नर सध्या आपला गळा फुगवून त्यावरचे करडे जांभळे मोहक रंग दाखवून कबुतरणीला वश करु बघत आहे. मध्येच दोघे माझ्या बाल्कनीत एकांत शोधायला येतात बहुतेक. पण मीही सध्या घरीच असल्याने त्यांची गैरसोय होते. परंतु त्यांना त्याची फारशी फिकीर नाही. माझ्यापासून दोन मीटर अंतर ठेवायचा सोशल डिस्टंसिंगचा नियम मात्र ते आवर्जून पाळतात. घरकामात अननुभवी असलेल्या माझ्याकडून चुकून ओट्यावर कसलेले भांडे खोलगट ताटलीत पाणी भरून केलेल्या खंदकात ठेवायचे राहून गेले तर सकाळीच सफाई कर्मचारी मुंग्या इमानेइतबारे रांग लावून आल्या. लॉक डाऊनला न जुमानता. भुकेल्या होत्या बिचाऱ्या. माझ्या मुलीनेही अलीकडेच तिच्या रूममध्ये पाल की झुरळ दिसले अशी आवई उठवून आजी-आजोबांच्या खोलीत मुक्काम हलवला. खरंही असेल तिचे. पण त्यांच्याही बेडरुममध्येही परवा अचानक ए...