नवी प्रतिज्ञा [२८ जुलै २०१२]
माझे मित्र 'एस डी गम्मतगौडा' यांचा मला आवडलेला लेख त्यांच्या अनुमतीने इथे प्रकाशित करत आहे
“अरे बाबा, तुला माहीत आहे का?” सकाळी शाळेच्या वाटेवर असताना आपल्या गाडीहाक्या बापाच्या ज्ञानात थोडी भर घालण्याच्या उद्देशाने चिंगी (वय वर्षे पाच) विचारती झाली.
“काय गं गुंडम?” समोरून रस्त्याच्या मधोमध प्रातर्विधी उरकून वळणाऱ्या गाईला वळसा घालत, दुसर्या गियरला तिसर्यात ढकलत, बाबाने आपले चार ज्ञानचक्षू उघडून ठेवले.
“अरे आपण जे टीव्हीवर बघतो ते सगळं खरं होतं!”
“काय सांगतेस? कसं काय गं?” बाबाचे ज्ञानचक्षू विस्फारले.
“काल मी झोरेमॉन पाहात होते तेव्हा ती अॅड लागली होती ना?”
“कुठली?”
“ती रे, फॅडबरीच्या फॉरियो बिस्कीटांची!?”
“हो का, मग?”
“अरे तीच बिस्कीटं मला काल गडुरा मॉलच्या त्या शॉपमध्ये दिसली.”
“गडुरा नाही...गरुडा”
“हां...गरुडा...अरे पण ती टीव्हीमधलीच बिस्कीटं तिथे कशी आली?”
“हॅ: हॅ:, गुंडमेश्वरी, अगं ती दुकानात विकायला ठेवली आहेत हे तुला कळावं म्हणून त्यांनी टीव्हीवर दाखवली.”
“पण ती बार्बीडॉलपण आधी मला 'आर्ट अटॅक’च्या वेळी दिसली होती!”
“हार्ट अटॅक?” बाबाचा ठोका चुकला.
“हार्ट नाही आर्ट...आऽऽर्ट...ते अंकल चित्र काढून दाखवतात आणि काय काय क्राफ्ट शिकवतात ना टीव्हीवर? तो प्रोग्रॅम.”
“ते होय. बरं बरं” तेवढ्यात बाबाचं लक्ष चौकात रातोरात बदललेल्या होर्डिंगवरच्या आकर्षिक सुंदरीकडे गेलं. चिंगीने ही संधी दवडली नाही.
“बाबा, मला तसा ड्रेस हवा.”
“कसा?”
“तो, ती आंटी घालून उभी आहे ना, तसा.”
“शी:, किती घाण दिसतोय तो...अख्खे खांदे उघडे दिसताहेत!”
मनोमन आवडलेल्या गोष्टीला खोटं खोटं नाक मुरडणे ही बाबापणाची एक जबाबदारी असते.
“ए छान दिसतोय...आपण माझ्या बर्थडेला घेऊया, ओके ?”
“नॉट ओके. आईला हे अजिबात आवडणार नाही.”
“अरे, पण आपण तिलापण घेऊया ना तसाच...”
“काय!” बाबा भयचकित! शेवटी आपल्या संस्कृतीचे रक्षण ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी असते आणि ती ते आपल्या बायकोच्या बाबतीततरी नेहमी सीरियसली घेतात.
“बरं, मग आपण माझ्या फ्रेंड्सना ‘पिझ्झा गट्ट’ मधे पार्टी देऊ, ओके ?”
“गेल्यावर्षी दिली होती ना? प्रत्येक बर्थडेला नसते काही बाहेर पार्टी द्यायची. त्यापेक्षा आपण घरीच सर्वांना बोलावून केक कापूया आणि काही स्नॅक्स देऊ.”
“मॅक्केन पोटॅटो स्नॅक्स?”
“ते कशाला? आई घरीच काहीतरी बनवेल ना!”
“पण ते खूप यम्म असतात...टीव्हीवर दाखवतात ना...आणि आईने काही बनवलं तर ती खूप दमेल...तिची पाठ दुखेल...मग काय तू तिला मूव्ह लावनू देणारेस का? आपल्याकडे ते नाहीच आहे!”
“काही दमत नाही आई. ती पोळीभाजी, वरणभात असं हेल्दी फूड खाते. त्यामुळे ती खूप स्ट्रॉंग आहे. तुझ्यासारखी फक्त नूडल्स आणि पास्ता नाही खात ती!” डोस पाजायची अशी संधी बाबा कसली सोडतोय.
“नूडल्सपण खूप हेल्दी असतात. त्यात रियल आटा असतो. बाबा, आटा म्हणजे काय?”
“आटा म्हणजे कणीक – गव्हाचं पीठ. तुला आटा म्हणजे काय तेपण माहीत नाही आणि म्हणे नूडल्स हेल्दी!”
“असं ते डॉक्टर अंकल सांगत होते.”
“कोण डॉक्टर अंकल?”
“त्या अॅडमधले.”
“पुन्हा अॅड ...अगं चिंगी, त्या अॅड वर जाऊ नकोस तू. त्यात काहीही दाखवतात. आता बघ...आपण
तुझ्यासाठी ती डोराची पेन्सिल आणली होती अॅड बघनू. त्याच्यामुळे मॅम खूष होतील असं अॅडमधे दाखवलं होतं. झाल्या का त्या खूष? उलट टोक सारखं मोडतं म्हणून ओरडल्या ना तुला?”
“हो रे. पण मग ते असं का दाखवतात टीव्हीवर?”
“खूप लोकांनी त्यांच्या गोष्टी विकत घ्याव्यात आणि त्यांना खूप पैसे मिळावेत म्हणून.”
“मग खूप पैसे मिळवून काय होतं, बाबा?”
आता क्लायमॅक्सचा साक्षात्कारी डायलॉग म्हणायची वेळ आल्याचं बाबाला जाणवलं. शाळेच्या गेटापाशी नो पार्किंगच्या बोर्डाखालीच गाडी उभी करत एकविसाव्या शतकाचे ते अंतिम सर्वव्यापी सत्य त्याने उद्याच्या त्या सिटीझनला, नव्हे, कनझ्युमरला सांगितले –
“खूप पैसे मिळवले की खूप गोष्टी विकत घेता येतात...तुम्हाला लागणाऱ्या आणि अजिबात न लागणाऱ्यासुद्धा!”
आपलं ‘छोटा भीम आणि चुटकी’ दप्तर पाठीला लावून चिंगी शाळेत शिरली. लवकरच घंटा होऊन,
शाळेची मौज पाहात थबकलेल्या बाबाच्या कानी कुठूनतरी प्रतिज्ञेचे शब्द पडले...
“भारत माझा बाजार आहे.
सारे भारतीय कस्टमर आहेत.
माझ्या बाजारावर माझे प्रेम आहे.
माझ्या बाजारातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या मॉल्सचा मला अभिमान आहे.
त्या मॉल्सचा रिपीट कस्टमर होण्याची हौस
माझ्या अंगी रहावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पॉकेटमनी देणार्यांचा, दुकानदारांचा
आणि जाहिरातदार कंपन्यांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाचा माल विकत घेईन.
माझा बाजार आणि माझे बाजारबुणगे
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद.”
(बाबाच्या लहानपणी त्याच्या पाठ्यपुस्तकातली प्रतिज्ञा काही वेगळीच होती. केवळ संदर्भासाठी ती इथे देत आहे.
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.)

Comments
Post a Comment